Bhosari News : शिक्षकदिनी घरोघरी जाऊन शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज शिक्षकदिनी शिवराज लांडगे आणि आमराई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इंद्रायणीनगर परिसरातील शिक्षकांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला. यावेळी 176 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

याबाबत माहिती देताना शिवराज लांडगे म्हणाले, ‘आयुष्यभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी आणि विद्यादानाचे कार्य शिक्षक करत असतात. हे व्रत यथायोग्य निभावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे हे आद्य कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबवला.’

या वेळी शिक्षकांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या संकपनेतून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.