Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून स्वच्छांजली

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन (Talegaon Dabhade) केल्यानुसार सर्वत्र रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्ताने एक तास स्वच्छता अभियान राबवून स्वच्छांजली अर्पण करत पंधरवडा सप्ताहाची सांगता करण्यात आली. या सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या स्वयंसेवकांनी जनजागृती,औषधी झाडांची लागवड,साफसफाई व स्वच्छता असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,प्राचार्य संभाजी मलघे,डी.फार्मसीचे प्राचार्य जी.एस शिंदे,इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस पी.भोसले, प्रा. गणेश म्हस्के,गोरख काकडे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.दीप्ती पेठे,प्रा.एस आर जगताप, प्रा.आर.आर.डोके,डॉ.योगेश झांबरे, प्रा.निलेश सोनवणे यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Talegaon Dabhade : नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा – मिलिंद अच्युत

वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम  अधिकारी प्रा. दीप्ती पेठे यांनी केले .

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,बी फार्मसी,डी फार्मसी,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता फेरी काढून स्वच्छते संबंधित घोषणा दिल्या. सुमारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना (Talegaon Dabhade) या स्वच्छता मोहिमेद्वारे आपल्या महाविद्यालयाचा परिसर नाहीतर सामाजिक भान म्हणून आपल्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपले घर,अंगण,गाव,महाविद्यालय स्वच्छ केले तरी खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना स्वच्छांजली ठरेल अशी आशा  त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ.योगेश झांबरे,प्रा. तेजस्विनी कोठावळे,प्रा. निलेश सोनावणे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त निरूपा कानिटकर आदी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डि.फार्मसीचे प्राचार्य प्रा. गुलाब शिंदे सरांचे  मार्गदर्शन (Talegaon Dabhade) लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.