Talegaon Dabhade : नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा – मिलिंद अच्युत

नगरपरिषदेत होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – नगरपरिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात (Talegaon Dabhade) ठेकेदारांना वेठीस धरून भ्रष्टाचार केला जात आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ठेकेदारांकडून लाच घेताना पकडण्यात आलेले अधिकारी कणसे हे आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावेत असे पत्र मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,श्री. कणसे हा एक मोहरा असून,मोठ्या प्रमाणात एक बडा अधिकारी लाच घेत असल्याची चर्चा तळेगाव शहरात रंगलेली आहे व त्याचा छडा जिल्हाधिकारी यांनी कमिटी नियुक्त करून लावणे अपेक्षित असल्याचे मिलिंद अच्युत यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मागील महिन्यामध्ये कचरा कॉन्ट्रॅक्ट विरुद्ध जन आंदोलन केले होते ते आंदोलन करताना एक महिन्याच्या आत मध्ये अहवाल सादर करतो असे मुख्याधिकारी श्री एन के पाटील यांनी आंदोलन कर्त्याना आश्वासन दिले होते ; परंतु आज दोन महिने झाले तरी अहवाल सादर झालेला नसून मुख्याधिकारी (Talegaon Dabhade) श्री पाटील हे कचरा कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

खरंतर कचरा कॉन्ट्रॅक्टच्या त्रुटींबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्याबाबत सविस्तर कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु अशी कुठलीही घटना घडली नसून तळेगाव शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नगर परिषदे मार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तळेगाव शहरात अनेक समस्या असून रस्ता, स्ट्रीट लाईट, भुयारी गटार, पाणी प्रश्न इत्यादी मूलभूत सुविधा प्रलंबित असताना देखील मुख्याधिकारी श्री पाटील हे शुक्रवारी गायब होऊन सोमवारी दुपारी प्रकट होत आहेत त्यामुळे 24 तास शहरावर प्रेम करणारा मुख्याधिकारी उपलब्ध व्हावा अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी मावळचे आमदार सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे, तसेच जिल्ह्याचे नेते आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली आहे.
नगरपरिषदेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी तसेच मावळचे प्रांत साहेब यांनी सक्रिय राहणे गरजेचे आहे. प्रशासक लागू झाल्यापासून नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे पत्रात मिलिंद अच्युत यांनी म्हटले (Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.