Talegaon Dabhade: महिला डॉक्टर, भाजी विक्रेत्यांची आई व बँक मॅनेजरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

Talegaon Dabhade: Corona test of female doctor, mother of vegetable sellers and bank manager positive मावळातील सक्रिय रुग्णांची संख्या 33 वर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे  येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 24  वर्षीय महिला डाॅक्टरचा आज शनिवार (दि 27) रोजी कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला व खळदेआळी दोन कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या बंधूंची 50 वर्षीय आई  अशा दोघींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असून या खेरीज तळेगावमधील एका बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कामाला असलेल्या पुण्यातील एका 55 वर्षीय व्यक्ती देखील कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ प्रवीण कानडे यांनी ही माहिती दिली.

तळेगाव जनरल हाॅस्पिटलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणा-या  24 वर्षीय महिला डाॅक्टरला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्रास जाणवू लागल्याने काल त्यांना डाॅ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल आज शनिवारी (27) रोजी पाॅझिटिव्ह आला आहे.

गुरूवारी खळदेआळी येथील 18 वर्षीय भाजी विक्रेता व काल शुक्रवारी 25 वर्षीय  त्याचा भाऊ या दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 50 वर्षीय आईचा काल स्वॅब घेण्यात आला होता. आज शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आज अखेर 23 पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी यातील 6 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून सक्रिय रूग्णांची संख्या 15 आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली.

_MPC_DIR_MPU_II

बँक मॅनेजरला कोरोनाची लागण 

तळेगावातील एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे 55 वर्षीय बँक अधिकारी पुण्यात विमाननगर भागात राहायला आहेत. त्यांच्यावर 26 जूनपासून शास्त्रीनगर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित कोरोनाबाधित बँक अधिकारी 21 जूनपासून बँकेच्या तळेगाव शाखेत आलेले नव्हते.  पुण्यातील रहिवासी असल्याने त्यांची नोंद मावळच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत करण्यात आलेली नाही.

तळेगाव शहरातील 6 आणि पुण्याहून येणारे 8 असे एकूण 14 बँक कर्मचारी त्याच्या निकटच्या संपर्कातील आहेत.  या 14 ही व्यक्तींचे स्वॅब नमुने काल बँकेमार्फतच कृष्णा हॉस्पिटल, पुणे यांच्या टीमने तळेगावमध्ये येऊन गोळा केले आहेत.  त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

मावळातील सक्रिय रुग्णांची संख्या 33 वर

मावळातील कोरोनाबाधितांची शहरी 29 व ग्रामीण 48 अशी एकूण संख्या 77 झाली असून त्यापैकी 03 जणांचा मृत्यू झाला. 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 33 आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

मावळात  कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.