Talegaon Dabhade : स्तनपान सप्ताह निमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने महिलांचे समुपदेशन

एमपीसी न्यूज – जागतिक आरोग्य संघटनेच्या स्तनपान सप्ताहच्या (Talegaon Dabhade) या वर्षीच्या घोष वाक्याला अनुसरून नोकरी करणाऱ्या महिला (working women) यांच्या मध्ये स्तनपानाविषयी जागरूकता वाढावी, या हेतूने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी यांच्या मदतीने फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स येथे महिलांचे समुपदेशन होते.

प्रकल्प प्रमुख डॉ नेहा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले,डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या बाल रोग तज्ञ विभाग प्रमुख डॉ शिल्पा माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डॉ कुलकर्णी व डॉ माने यांनी बाळ आणि आई दोघांच्या आरोग्याच्या (Talegaon Dabhade) दृष्टीने स्तनपान किती महत्वाचे आहे, हे अनेक दाखले देत पटवून सांगितले.

Akurdi : मिस्टिक बांबू गुरुपोर्णिमा उत्सवामध्ये उदयोन्मुख कलाकारांचे प्रभावी बासरी वादन

मेडिकल डायरेक्टर डॉ ज्योती मुंडर्गी यांनी आभार मानले, 100 पेक्षा जास्त महिला कर्मचारी या वेळी उपस्थित राहिल्या,तर क्लबच्या वतीने फर्स्ट लेडी अर्चना चितळे व रोटरी मेंबर्स उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.