Pimpri : 5067 जणांना डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव, आय ड्रॉपचा तुटवडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याची साथीचा (Pimpri)प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. साथ सर्वत्र पसरली असून 20 जुलैपासून शहरातील 5 हजार 67 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यात शाळेतील मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. रुग्ण वाढल्याने शहरात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ आली आहे. सुरुवातीला आळंदीत साथ आली होती.

त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ही सात आली आहे. डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. हा आजार साथीचा आहे. त्यामुळे झपाट्याने त्याचा प्रसार होत आहे. महापालिकेने 20 जुलैपासून डोळे लागण होणा-या रुग्णांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.

20 जुलैपासून शहरातील 5 हजार 67 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शाळकरी मुलांसह सर्वच (Pimpri) वयोगटातील नागरिकांना प्रादुर्भाव होत आहे.

कोठे होतात उपचार?

डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात उपचार केले जात आहेत. डोळ्यात सोडण्याचे औषध देवून रुग्णाला घरी सोडले जाते. त्यावर रुग्ण बरे होत आहेत.

मासुळकर कॉलनीतील आय रुग्णालयातही उपचार केले जात आहेत. डोळ्यात सोडण्याचे औषध दिले जाते. एखाद्या रुग्णाला जास्त त्रास होत असल्यास दाखल केले जाते.

Alandi : आळंदीत डोळे लागण रुग्ण संख्येत घट

महापालिकेने काय केल्या उपाययोजना?

प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये होते. ज्या शाळेत पाचपेक्षा जास्त मुलांना प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे.

शाळेने तपासणीस बोलविल्यास वैद्यकीय टीम शाळेत जावून मुलांची तपासणी करत आहे. ज्या भागात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्या भागाचा सर्व्हे केला जात आहे.

शहरात आय ड्रॉपचा तुटवडा

शहरात मोठ्या संख्येने या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आय ड्रॉपची मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने औषधांच्या दुकानात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत आहे.

औषध दुकानदारांच्या विक्रेत्यांच्या मागणीनुसार औषधांचे होलसेल विक्रेते केवळ निम्म्याच औषधांचा पुरवठा करत आहेत. शहरातील होलसेल डीलरकडून मेडिकल विक्रेत्यांना केवळ एक हजार अँटिबायोटिक ड्रॉपची विभागणी करण्यात येत आहे.

महापालिकेचे आवाहन काय?

पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.

एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.