Pimpri : डोळ्यांच्या साथीचा फैलाव सुरुच, 6441 जणांना प्रादुर्भाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या (Pimpri) साथीचा फैलाव सुरुच आहे. याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून आत्तापर्यंत 6 हजार 441 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी 650 जण बरे झाले असून 6 हजार 721 सक्रिय आहेत. आत्तापर्यंत एकाही जणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. डोळ्यात सोडण्याचा ड्रॉप घेवून रुग्ण बरे होत आहेत.

डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. हा आजार साथीचा आहे. त्यामुळे झपाट्याने त्याचा प्रसार होत आहे. वातावरणातील बदलामुळे याचा संसर्ग होत आहे. महापालिकेने 20 जुलैपासून डोळे लागण होणा-या रुग्णांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. 20 जुलैपासून शहरातील 6 हजार 441 जणांना प्रादुर्भाव झाला आहे.

रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शाळकरी मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना प्रादुर्भाव होत आहे. शहरातील सर्वच भागात या साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांमध्ये वाढ झाल्याने ड्रॉपचा तुटवडा जाणवू लागला आहे.

डोळे येण्याचे प्रमाण सध्या लहान मुलांमध्ये जास्त आहे. डोळे येण्याचा आजार सर्वच वयोगटातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्याचे आवश्यकता आहे.

Pune : बुडित कर्ज मंजूर करण्यासाठी अमर मुलचंदानी यांना 20% किकबॅक, ईडीचे अतिरिक्त आरोपपत्र सादर

हाताची स्वच्छता बाळगावी. हात वारंवार धुवावेत. वारंवार हात डोळ्याला लावू नये. कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.

डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे (Pimpri) आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.