Pune Police : झुमकार ऍप्लिकेशनद्वारे गाड्या भाड्याने घेऊन पाकिस्तान सीमेजवळ विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

एमपीसी न्यूज – पाकिस्तान सीमेजवळ गाड्या भाड्याने (Pune Police) घेऊन त्यानंतर विकणाऱ्या टोळीचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून 60 लाख किंमतीच्या तीन कार जप्त केल्या आहेत.

सुफियान चौहान (वय 19 रा. फतेगंज, गुजरात) याला इंदूर येथे अटक करण्यात आली. संशयिताचे दोन साथीदार सध्या फरार आहेत, त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, झूमकार कंपनीच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. चौहान वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख पटवणाऱ्या कार भाड्याने द्यायचा आणि नंतर त्या विकायचा. खराडी येथील 20 लाख रुपये किंमतीची एमजी हेक्टर कार भाड्याने घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

Pimpri : 5067 जणांना डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव, आय ड्रॉपचा तुटवडा

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाणे येथे 7 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात (Pune Police) आला. आरोपींनी वाघोली आणि विश्रांतवाडी येथून महागड्या गाड्या भाड्याने घेऊन राजस्थानमध्ये कमी किंमतीत विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना संशयित इंदौरला जाण्याचा विचार करत असल्याचे पोलिसांना कळले.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांच्यासह पोलीस शिपाई श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विकास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ यांच्या पथकाने इंदोरला रवाना होऊन संशयिताला पकडण्यात यश मिळविले आहे. याचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.