Pune : ‘आय विल किल नरेंद्र मोदी’; दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आला धमकीचा मेल

एमपीसी न्यूज : पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमधून (Pune) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांना उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. 

सोशल माध्यमावर विदेशातून मोखीम या नावाने एका अज्ञात व्यक्तीने हा मेल केला आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे या मेलमध्ये लिहिले आहे.

देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम याने दिली आहे.  या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता, त्यांनी पुणे शहर पोलीस (Pune) दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Police : झुमकार ऍप्लिकेशनद्वारे गाड्या भाड्याने घेऊन पाकिस्तान सीमेजवळ विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

अलंकार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.