Hari Narke : लेखक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील लेखक, वक्ता, ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध (Hari Narke) असणाऱ्या हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. 

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राहिले.

Pune : ‘आय विल किल नरेंद्र मोदी’; दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आला धमकीचा मेल

मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. तर महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.