Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अध्वर्यू डाॅ अशोक निकम यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील (Talegaon Dabhade) अध्वर्यू डाॅ अशोक सावळाराम निकम (वय 96) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. 

Maval : श्री क्षेत्र घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर

तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक जनरल हाॅस्पिटलचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ डॉ. निकम यांनी धुरा सांभाळली. लंडन येथे जाऊन अभ्यास करत एफआरसीएस ही पदवी संपादन केली. अत्यंत शांत, संयमी, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. वैद्यकीय क्षेत्रात अनेक पुरस्कार डॉ. निकम यांना मिळाले होते.
त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगावचे सदस्य मिलिंद निकम यांचे ते वडील (Talegaon Dabhade) होत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.