Talegaon Dabhade : गाडीला धडक देत गाडीचालकाला मारहाण करत 10 हजार लुबाडले

एमपीसी न्यूज – गाडीला धडक देत गाडी चालकालाच (Talegaon Dabhade) मारहाण करत त्याच्याकडून 10 हजार रुपये लुबाडले आहेत. ही घटना सोमवारी (दि.6) जुना मुंबई-पुणे महामार्गावर सीआरपीएफ गेट समोर घडली आहे.

याप्रकरणी आसिफ शफी शेख (वय 40 रा.वडगाव मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संकेत बिरामाने, चेतन बिरामाने त्यांचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Diwali 2023 : जाणून घ्या यंदाच्या दिवाळीचे मुहूर्त!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या गाडीने फिर्यादी यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. यात फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान झाले. फिर्यादीची चूक नसताना आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

 

फिर्यादीला जबरदस्ती गाडीमध्ये बसवून  वारजेकडे नेले. तेथे फिर्यादीच्या गाडीचे मालक शरद घारे तेथे आले असता आरोपींनी त्यांच्याकडून 10 हजार रुपये काढून घेतले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Talegaon Dabhade)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.