Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात दीक्षारंभ व पालक मेळावा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संस्था (Talegaon Dabhade) संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ शनिवारी (दि. 30) संपन्न झाला. कार्यक्रमासाठी फार्मसी क्षेत्रातील मान्यवर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक आदराचे बाळकडू विद्यार्थी जीवनातच मिळते, असे मत यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर, Gennova biopharmaceutical ltd चे assistants general manager डॉ.भालचंद्र वैद्य, बी व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे, प्रा जी एस शिंदे,प्रा गणेश म्हस्के तसेच मोठ्या प्रमाणात फार्मसीचे विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमास विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.आपल्या अध्यक्षीय भाषणात तरुण पिढीने सामाजिक भान राखणे अत्यंत गरजेचे आहे, समाजाप्रति असणारा आदरभाव जपला गेला पाहिजे आणि त्याचे बाळकडू हे विद्यार्थी दशेतच मिळावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. गणेश म्हस्के यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित्यांचे स्वागत केले.प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. Gennova biopharmaceutical ltd चे assistants general manager डॉ.भालचंद्र वैद्य हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.ध्येयवादी असण्यासाठी अंगभूत गुण आणि स्वयंशिस्त या वर त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात 2023 -24 पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Pune : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, 2,568 क्युसेक विसर्ग सुरु

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना लोखंडे, शलाका काटकर व पायल गौतरणे यांनी केले. तर प्रा. कादंबरी घाटपांडे यांनी आभार मानले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे,कोषाध्यक्ष शैलेश शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी (Talegaon Dabhade) मलघे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. द्वितीय वर्ष बी. फार्मसी वर्गाच्या प्रतिनिधिनचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.