Talegaon Dabhade : कै. विश्वनाथराव दाभाडे स्मृती हिंदमाता व्याख्यानमालेस आजपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त (Talegaon Dabhade) व कै. रोहित रवींद्रनाथ दाभाडे यांच्या 17 व्या स्मृती दिनानिमित्त 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत कै. विश्वनाथराव दाभाडे स्मृती हिंदमाता व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज (शुक्रवारी, दि. 9) सायंकाळी सहा वाजता श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज संस्थान भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप साहेबराव काशीद यांच्या हस्ते होणार आहे.

नाना भालेराव कॉलनी येथील सेवाधाम ग्रंथालयाच्या मैदानात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. उद्घाटन सत्रात कबीर महाराज अत्तार यांचे छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक या विषयावर व्याख्यान होणार आहे. तळेगाव स्टेशन येथील बालाजी मंदिरचे मुख्य विश्वस्त (Talegaon Dabhade) प्रसाद इखे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

शनिवारी(ता.10 )प्रा.संजय कळमकर(अहमदनगर) यांचे आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे आहेत.

Alandi : सोळू येथील घटनेत मृत्यूंचा आकडा वाढला; तिघांचा मृत्यू, 19 जखमी

रविवारी ( ता.11)तुकाराम चिंचणीकर (पंढरपूर) यांचे आयोध्या राम मंदिर – इतिहास व संघर्ष या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगरसेवक संतोष भेगडे भूषविणार आहेत.

व्याख्यानमाला तळेगाव स्टेशन येथील नाना भालेराव कॉलनी येथे सेवाधाम ग्रंथालय प्रांगणात सायंकाळी 6वा. होणार आहे.अशी माहिती हिंदविजय पतसंस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे आणि सचिव कैलास भेगडे यांनी दिली.

youtube.com/watch?v=rdFR0KCX25c

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.