Talegaon Dabhade : माजी विद्यार्थी प्रसिद्ध सतार वादक बनतो तेंव्हा……

एमपीसी न्युज – ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या शाळेचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध सतार वादक बनतो. त्याच्या सतार वादनाचा तब्बल 150 वा कार्यक्रम शाळेत संपन्न होतो,(Talegaon Dabhade) यासारखा दुग्धशर्करा योग दुसरा नाही. हा सतार वादनाचा कार्यक्रम शाळेमध्ये घेता आला हे आम्हा सर्वांचे भाग्यच समजतो असे प्रतिपादन ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी केले.

नूतन विद्या मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी पंडित महाजन यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विश्वास देशपांडे,अपर्णा महाजन,कोनकर काका,पंडितजींचे नातेवाईक, शिष्य व संगीत क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती.

पंडित महाजन यांनी रागसंगीत विद्यार्थ्यांना समजावा, सतार हे भारतीय वाद्य विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावे,शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून 150 वा कार्यक्रम शाळेत व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे नियोजन शाळेमध्ये केले होते.त्यांच्या समवेत त्यांच्या शिष्या योगिता व वेदांशी या गुरु शिष्यांनी मिळून सतार वादनातून शाळेचा संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला.

Today’s Horoscope 27 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी आभार मानले. (Talegaon-Dabhade) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग कापरेसर व संपूर्ण शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील अध्यापिका आरती पोलावार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.