Today’s Horoscope 27 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – मंगळवार.

27-12-2022

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – धनिष्ठा 14.17 पर्यंत नंतर शततारका. 

चंद्र राशी – कुंभ.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- मेष )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात आज काही सौम्य मतभेद होतील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिक मंडळी ही देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. आज तुम्हाला दैव अनुकूल राहील.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ राहील. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

सिंह (शुभ रंग- मरून)

धंद्यातील येणी वसूल होतील. विरोधकांशीही गोड बोलून तुम्ही आपला स्वार्थ साधून घ्याल. जुनी दुखणी अंगावर काढू नका आज विश्रांती ही आवश्यक आहे.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी)

कला क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

Pune : राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे विभागाला चार सुवर्णपदके

तूळ ( शुभ रंग- हिरवा)

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी अचानक येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस आनंदाने करतील.

वृश्चिक (शुभ रंग- निळा )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज तुम्हाला काही शुभ समाचार येणार आहेत.

धनु- (शुभ रंग- मोतिया)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. क्षुल्लक कारणावरून शेजारी रुसून बसतील आज जरा स्वभावातील स्पष्टवक्तेपणास आवर घालायला हवा. त्यामुळे नाती दुरावतील.

मकर ( शुभ रंग- भगवा )

आज तुम्ही काही से लहरीपणाने मागाल कुणाचीही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. हातचे सोडून पडत्या मागे धावावेसे वाटेल, पण तसे करू नका.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

एखादी हरवलेली वस्तू सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरामोठ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत.

मीन -(शुभ रंग – जांभळा)

महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील हातचे सोडून मृगजळा मागे धावणार आहात.

 

 

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.