Pune : राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे विभागाला चार सुवर्णपदके

एमपीसी न्यूज : जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने (Pune) शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबर रोजी पुणे विभागाने चार सुवर्णपदके पटकाविली.

पुणे विभागाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने सांघिक प्रकारात तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लोअर एक्सरसाईझ या वैयक्तिक क्रीडा प्रकारात निशाद नरवणे याने सुवर्णपदक पटकविले. तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अनइव्हन बार या क्रीडा प्रकारात श्रावणी पाठक व 17 वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लोअर एक्सरसाईझ या क्रीडा प्रकारात सिद्धांत कोंडे याने सुवर्णपदक पटकविले.

Chinchwad News : गृहनिर्माण संस्थांमधील ‘एसटीपी’ दिखाव्यापुरतेच, मैलामिश्रित पाणी सोडले जातेय नदी पात्रात – श्रीरंग बारणे

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे – Pune

14 वर्षाखालील मुले – वैयक्तिक – फ्लोअर एक्सरसाईज – 1) निशाद नरवणे, पुणे विभाग (13.85), 2) श्रीयश पाटील, मुंबई 3) यश पाटील, नाशिक. पॉमेल हॉर्स – 1) श्रियश पाटील, मुंबई (11.95) 2) निषाद नरवणे, पुणे 3) प्रसन्न कुचेकर, मुंबई

14 वर्षाखालील मुलीः- वैयक्तिक- टेबल व्हॉल्ट- 1) सारा राऊळ, मुंबई (11.32) 2) रिद्धी जट्टी, औरंगाबाद 3) साक्षी दळवी, मुंबई. अनइव्हन बार – 1) श्रावणी पाठक, पुणे (11.90) 2) रितिषा इनामदार, पुणे 3) सारा राऊळ, मुंबई. फ्लोअर एक्सरसाईझ – 1) साक्षी दळवी, मुंबई (11.35) 2) श्रावणी पाठक, पुणे 3) अनन्या शेट्टी, मुंबई

17 वर्षाखालील मुलेः- सांघिक- 1) मुंबई विभाग- आर्यन दवंडे, आध्यान देसाई, अमन देवाडीगा, नील काळे, यजत शिंदे, जश पारीख, 2) पुणे विभाग 3) नाशिक विभाग
वैयक्तिकः- ऑल राउंड चॅम्पियन – 1) आर्यन दवंडे, मुंबई विभाग (72.90) 2) सिद्धांत कोंडे, पुणे विभाग 3) आध्यान देसाई, मुंबई. फ्लोअर एक्सरसाईझ – 1) सिद्धांत कोंडे, पुणे (11.95) 2) कौस्तुभ अहिरे, नाशिक 3) आर्यन दवंडे, मुंबई

17 वर्षाखालील मुलीः- सांधिक- 1) पुणे विभाग- रिया केळकर, शताक्षी टक्के, उर्वी वाघ, हर्षिता काकडे, तन्वी कुलकर्णी, शांभवी सरोज 2) मुंबई विभाग 3) औरंगाबाद विभाग
वैयक्तिकः- ऑल राउंड चॅम्पियन- 1) अनुष्का पाटील, मुंबई (40.15) 2) रिया केळकर, पुणे 3) उर्वी वाघ, पुणे टेबल व्हॉल्ट- 1 अनुष्का पाटील, मुंबई (11.55) 2) रिया केळकर, पुणे 3) सारा पवार, मुंबई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.