Talegaon Dabhade : विलास काळोखे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिरास एक किलो चांदी

एमपीसी न्यूज – मावळ तालुका क्रशर उद्योग समूहाचे अध्यक्ष, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे संचालक, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलासराव काळोखे यांचा (Talegaon Dabhade)  वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विलास काळोखे यांच्या हस्ते तळेगावातील पौराणिक विठ्ठल मंदिराच्या मखरासाठी एक किलो चांदी देण्यात आली.

नेतृत्व,कर्तृत्व आणि दातृत्व या सद्गुणांचा त्रिवेणी संगम असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे विलास काळोखे. 14 जुलै रोजी त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा झाला.

ईस्टीन हाॅटेल, माळवाडी येथे अभिष्टचिंतन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

विविध क्षेत्रातील अग्रगण्य मान्यवर, रोटरी सिटी परिवार, योगा परिवार, विठ्ठल मंदिर परिवार, काळोखे फॅमिली व सगेसोयरे विलास काळोखे मित्र परिवार मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली.

समारंभात विलास काळोखे यांच्या हस्ते तळेगावातील पौराणिक विठ्ठल मंदिराच्या मखरासाठी एक किलो चांदी विश्वस्त ह.भ.प. ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे व यतिन शहा यांच्याकडे‌ सुपुर्त केली.

तळेगाव येथील स्वा.सावरकर गुरूकुलातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचे रेशन व गोदरेज कपाट समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य भगवान शिंदे यांनी केले.

उद्योजक दादासाहेब उ-हे, दिलीप पारेख, भानुदास काटे पाटील, ह.भ.प.माऊली महाराज दाभाडे यांनी मनोगताद्वारे विलास काळोखे यांना (Talegaon Dabhade) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.