Talegaon Dabhade News : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रायन क्लबचे वर्चस्व

एमपीसी न्यूज – स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रायन क्लबच्या पाच संघांनी आठ पैकी पाच गटात विजयाची नोंद करत सर्वसाधारण विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतून खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे.

नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 14 संघांतील 184 फुटबॉलपटूंनी भाग घेतला. येत्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याचे असोसिएशनचे सचिव विजय टेपगुडे आणि राष्ट्रीय खेळाडू मनोज स्वामी यांनी सांगितले.

यावेळी स्पोर्ट्सइंडीचे वरिष्ठ अधिकारी अमीन खान, ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कुलचे विश्वस्त साहेबराव बोडके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पंच विजय कुमार चिनय्या, रोहित पाठक, मोहित पाठक, घनश्याम राणा, स्टँडली बर्फे, मतेश मुनय्यापन, अनिल सिंग, संतोष माळी यांचा सत्कार करण्यात आला. स्पोर्ट्सइंडीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची माहिती अमीन खान यांनी दिली. त्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्राचार्य संजय क्षीरसागर व क्रीडा संचालक राजेंद्र लांडगे, क्रीडा सहाय्यक रवींद्र दाभाडे, ॲडव्होकेट गणेश बाबर, ॲडव्होकेट अविनाश कोयते, सीआरपीएफचे कमांडन्ट विजय कुमार नायर व अनिल सिंग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू आणि रायन अकॅडमीचे प्रमुख मनोज स्वामी यांनी विजेत्या संघाना राज्यस्पर्धेसाठी मार्गदर्शन केले व विजेत्यांचे अभिनंदन केले.

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचा गटनिहाय निकाल याप्रमाणे:-

(स्पर्धक 17 वर्षाखालील मुले)
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

(स्पर्धक 17 वर्षाखालील मुली)
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

(स्पर्धक 14 वर्षाखालील
रायन फुटबॉल) अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड तृतीय

(स्पर्धक 12 वर्षाखालील)
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, भोसरी प्रथम
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

(स्पर्धक 10 वर्षाखालील)
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, भोसरी प्रथम
नोवेल इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

(स्पर्धक 8 वर्षाखालील)
रायन फुटबॉल अकॅडमी अ प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय

(यामध्ये 6 वर्षाखालील)
नोवेल इंटरनॅशनल स्कुल चिंचवड प्रथम
रायन फुटबॉल अकॅडमी ब द्वितीय
रायन फुटबॉल अकॅडमी अ तृतीय

स्पोर्ट्सइंडीच्या संस्थापक आणि सीईओ सुप्रिया बडवे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल फिल्म आणि क्रीडाप्रेमींसाठी चांगली संधी आहे. त्यांच्यातील कला व क्रीडागुणांना वाव देणारे हे व्यासपीठ आहे. आकर्षक बक्षिसे आणि सेलिब्रिटीच्या उपस्थितीत परितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. -अमीन खान, क्रिएटिव्ह हेड, स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.