Talegaon Dabhade : कांतीलाल शहा विद्यालयाला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर येथे 9 व 10 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या (Talegaon Dabhade) क्रीडा स्पर्धांमध्ये इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शहा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक, रिद्मिक योग, वेटलिफ्टींग, हॉलीबॉल,मल्लखांब इत्यादी क्रीडा प्रकारात विद्यालयाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत यश मिळवले.

या स्पर्धा दि 9 व 10 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी विद्या मंदिर येथे (Talegaon Dabhade) पार पडल्या विद्यार्थ्यांनी मुलांच्या व मुलींच्या चौदा व सतरा वर्षे वयोगट स्पर्धेत व्हॉलीबॉल या खेळात चौदा वर्ष मुलींनी प्रथम क्रमांक व मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सर्वज्ञा प्रदीप जाधव हीने सर्वात उत्कृष्ट खेळी केली. व 4×400 मीटर रिलेमध्ये तृतीय क्रमांक श्रेया संदीप शिरसाठ,
मानसी संजय काशीद,सानिका शैलेश धर्माधिकारी, ज्ञानेश्वरी साईनाथ टेमगिरे.

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षावर पलटवार

600 मीटर धावणे व 80 मीटर हर्डल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – राजदीप दिनेश बोढरे

100 मीटर हर्डल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- मानसी संजय काशीद
100 मीटर हर्डल्स स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक-सानिका शैलेश धर्माधिकारी

110 मीटर हर्डल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- साई गंगाधर ताजणे

तसेच जिल्हा स्तरावर वेटलिफ्टींग स्पर्धेमध्ये सई अमोल शिंदे प्रथम तर भक्ति अशोक जांभुळकर द्वितीय क्रमांक,जिल्हा स्तरावर रिद्मिक योग स्पर्धेमध्ये सिद्धीक्षा अभिषेक यतकर हीने तृतीय क्रमांक मिळवला व रोप मल्लखांब चौथा क्रमांक मिळवला.

 

विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मानसी देशमुख, महेश यादव,अमोल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी व अर्चना चव्हाण यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.