Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात मुलींचा रास दांडिया कार्यक्रम

एमपीसी न्यूज – नवरात्र उत्सव हा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण करत (Talegaon Dabhade)असतो. नवरात्री मध्ये ठिकठिकाणी रास दांडिया खेळण्याची प्रथा आहे. त्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी महाविद्यालयात कनिष्ठ विभागाचा मुलींचा रास दांडिया कार्यक्रम शुक्रवारी (दि. 20) उत्साहात पार पडला. यामध्ये पाचशे मुलींनी सहभाग घेतला.

कार्यक्रम प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के. मलघे,(Talegaon Dabhade)कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.पी.भोसले,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. विजयकुमार खंदारे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते भोंडल्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ. हुलावळे मॅडम, सर्व विभाग प्रमुख, त्याचबरोबर सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.

Maval : तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळक्यावरुन आमदार शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कार्यक्रम प्रसंगी पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना म्हटले की आपली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी आहे. नवरात्र उत्सव हा सर्व महिला वर्गामध्ये एक उत्सवाचे,आनंदाचे वातावरण निर्माण करत असतो. आपल्याला आनंद देत असतो.आणि म्हणून आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. एस. के.मलघे यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने भव्य असे मैदान उपलब्ध केल्यामुळे असे अनेक कार्यक्रम आपल्याला घेता येतात.आजही नवरात्र उत्सवानिमित्त मुलींसाठी भोंडल्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व मुलींनी दांडियाच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशा शुभेच्छा दिल्या.

अनेक मुलींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने आमच्यासाठी हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे मनापासून आभार मानले.संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्या निरूपा कानिटकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपूर्ण शांततेत पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.यु खाडप यांनी केले तर प्रा.हर्षदा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.