Talegaon Dabhade: सरस्वती विद्या मंदिरमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये विविध स्पर्धा तसेच प्रबोधनपर व्याख्यानाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी व प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक नितिन शिंदे यांनी माहिती सांगितली. बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील महिला कर्मचारी यांच्या संगीत खुर्ची व रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आल्या. शोभा जाधव, दिव्या मंडलिक, वृषाली गाडे या विजेत्या शिक्षिकांना वसुधा बोकील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

ओळख स्पर्शाची अंतर्गत अनिता कुंभार यांनी विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टच व या वयातील सुरक्षितता व धोके याबद्दल माहिती सांगितली.अरुंधती देशमाने व छाया सांगळे यांनी माध्यमिक विभागातील मुलींना मार्गदर्शन केले.

सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड व सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.