DehuRoad: शिवसेना सदस्य नोंदणीला प्रारंभ

एमपीसी न्यूज – देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने देहूरोड येथील शंकर मंदिर येथील संपर्क कार्यालयात  शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा  प्रारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, शहरप्रमुख भरत नायडू, महिला आघाडी तालुका संघटक शैला खंडागळे, माजी शहरप्रमुख रमेश जाधव, महिला आघाडी संघटक सुनंदा आवळे, विभागप्रमुख विजू थोरी, देवा कांबळे ,शशी सप्पागुरु, अमर आवळे, विशाल दांगट, विजय दांगट, रफिक शेख, सुनील चंडालिया, दीपक दलाल, साहिल डिका, प्रकाश म्हासे, जसबीर बिडलान, आनंद देईल, सोपान देवरे ,ओमकार दांगट, माणिक बहोत, मनोज कांबळे, अक्षय गुंडले,  विकास वंजारे, अक्षय जाधव, विमल गावडे, लक्ष्मी अक्का मिनगी, विनीत सूर्यवंशी, सुशिल श्रीवास, विक्रम रोकडे, नीलकंठ सालवे, बाबु तुपदोर आदी उपस्थित होते.

शहरप्रमुख भरत नायडू म्हणाले,  देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीमधील सातही वॉर्डांमध्ये ही सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे.  या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरातून दोन हजार सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष असून  ते पूर्ण करणारच आहोत.

माजी शहरप्रमुख रमेश जाधव म्हणाले,  शिवसेना घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठी ही सदस्य नोंदणी आम्ही सुरू केली आहे.  त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.  सर्व समाजघटक शिवसेनेसोबत  जोडले जात आहेत,  याचा आम्हाला आनंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.