Talegaon : दिवंगत मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमीत्त आयोजीत सदाबहार गाण्याच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – दिवंगत मोहम्मद रफी यांच्या (Talegaon) जयंती निमित्त रविवारी (दि.24)  स्व. मोहम्मद रफि फॅन क्लब तळेगाव दाभाडे यांच्या वतीने लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व पुष्पहार पंडित किरण परळीकर, माजी नगरसेविका कल्पना भोपळे, मोहम्मद रफी फॅन क्लबचे संस्थापक व माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, उद्योजक बाबा चौरे, मोहम्मद रफी फॅन क्लबचे अध्यक्ष नितीन खळदे बाळकृष्ण लोणकर हस्ते करण्यात आले.यावेळी तळेगाव दाभाडे शहरातील जेष्ठ पत्रकार पंडित सुरेश साखळकर, विलास भेगडे, अमीन खान, महेश भागीवंत, रेखा भेगडे,जमीर नालबंद सह महान गायक मोहम्मद रफी यांचे चाहते, रसिक वर्ग ,मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Pune : स्वयंघोषित भाई अतिश डिंगरे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई

या कार्यक्रमामध्ये अनेक गायकांनी भाग घेतला. त्यामध्ये संस्थापक (Talegaon) सदस्य सतिश देशपांडे, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, चीफ इंजिनिअर (त दा न प ) मल्लिकार्जुन बनसोडे, सुभाष वाळुंज ,अमोल बर्वे, नागराज मुंडरर्गी, सुरेश काळे, वरदा मातापूरकर, आयशा सय्यद, विजय चौधरी, प्रकाश हेरेकर सोनाली यादव, आरिफ सय्यद आदी 25 गायकांनी भाग घेतला. साउंड सिस्टमची जबाबदारी विजय चौधरी यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.

मोहम्मद रफी फॅन क्लबचे सभासद बाळकृष्ण लोणकर, बशीर पठाण अमित कुलकर्णी,तुषार खेर्डे, यश हंबीर, पराग गायकवाड, रवींद्र वैद्य आदी सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ सभासद अनिल धर्माधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.