Pune : लोकसभा निवडणुकीत मविआचं बळ वाढणार – शरद पवार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune)मविआचं बळ वाढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. पण, हे खरं आहे की गेल्या 10 ते 15 वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही.

मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो, असेही पवार यांनी सांगितले. पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी पवार आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Pune : स्वयंघोषित भाई अतिश डिंगरे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई

आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला (Pune)होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही.

फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, अशा शब्दांत पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला.

त्यामुळे सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असेही पवार म्हणाले. इंडियाच्या बैठकीत मी स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे, असे सांगितले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.