Pune : स्वयंघोषित भाई अतिश डिंगरे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – एका सोसायटी समोर आरडाओरडा (Pune)करत सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून ‘आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत, तू आम्हाला बोलतो का’ अशी धमकी देत तोडफोड केल्याची घटना 13 नोव्हेंबर रोजी माळवाडी वडगाव शेरी येथे घडली होती.

त्यातील आरोपी अतिश डिंगरे आणि त्याच्या पाच साथीदारांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

Akurdi : नाट्य संमेलनामुळे पिंपरी-चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल – अजित पवार

टोळी प्रमुख अतिश उमेश डिंगरे (वय 23, रा. दीपक चौपाटी, (Pune)ता. वणी, जि. यवतमाळ), स्वप्नील गोवर्धन ओव्हाळ (वय 22, रा. वडगाव शेरी, पुणे), कुणाल महेंद्र परिहार (वय 20, रा. वडगाव शेरी, पुणे), आकाश हरिश्चंद्र पायगुडे (वय 22, रा. लोहगाव, पुणे), अजय राम घनघाव (वय 23, रा. विश्रांतवाडी, पुणे), आदित्य संदेश कांबळे (वय 21, रा. वडगाव शेरी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

टोळी प्रमुख अतिश डिंगरे आणि त्याच्या साथीदारांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. या टोळीने मागील दहा वर्षात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आर्थिक फायद्यासाठी व वर्चस्वासाठी आरोपी गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी मकोका कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला.

त्यानुसार अपर पोलीस आयुक्तांनी या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून आजवर 106 गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.