Talegaon : कोणत्याही परवानगी शिवाय शेतात नांगरणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – परवानगी शिवाय दुसऱ्याच्या शेतात नांगरणी (Talegaon) करणाऱ्या एकावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 16 जुलै रोजी तळेगाव येथील गट क्रं. 333 व गट क्रं 334 येथे घडली आहे.

याप्रकरणी सुहास बळीराम गरूड (वय 47, रा.तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सागर बारकु भेगडे (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व गणेश वसंतराव खांडगे (वय 52, रा. तळेगाव दाभाडे) यांच्या मालकिच्य़ा जमिनीवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आरोपीने नांगरणी केली आहे.

PCMC : करसंकलन विभागाची कामगिरी; 120 दिवसांत 500  कोटींची उच्चांकी वसुली!

यावेळी त्यांनी फिर्यादी यांची कोणती ही परवानगी घेतली नव्हती. याबद्दल विचारले असता आरोपींनी (Talegaon) फिर्यादींना शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.