Tata Motors Buisiness News : नोव्हेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या विक्रीत 108 टक्क्यांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज – नोव्हेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या (Tata Motors) विक्रीत 108 टक्के वाढ झाली आहे. तसेच भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सचे शेयर 7.5 टक्के झाले आहेत. टाटा मोटर्सने वर्षाच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपल्या कारची विक्री डबल केली आहे. टाटा मोटर्स मारुती सुझुकी आणि ह्युंदाई नंतर तिसऱ्या नंबरवर आहे.

नोव्हेंबर महिन्यात टाटा मोटर्सने आपल्या वेगवेगळ्या कारची मिळून एकूण 21 हजार 600 युनिट्सची विक्री केली आहे. जी नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत दुप्पट आहे. परंतु, मंथली सेलमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2020 मध्ये टाटा मोटर्सने 23 हजार 600 कारची विक्री केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टाटा मोटर्सने केवळ 10 हजार 400 कारची विक्री केली होती. भारतीय कार बाजारात टाटा मोटर्सचे मार्केट शेयर सध्या 7.5 टक्क्यांसबोत तिसऱ्या स्थानावर आहे.

टाटा मोटर्सच्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रॉजसोबत (Tata Altroz), मिड साइज इसयूव्ही (Tata Nexon), एसयूवी हॅरिअर (Tata Harrier), हॅचबॅक टियागो (Tata Tiago) आणि सिडान टिगॅार (Tata Tigor) सह अन्य कारची भारतात बंपर विक्री होत आहे.

दुसरीकडे मारुती सुझुकीने भारतीय कार बाजारावर कब्जा केला आहे. मारुतीचे शेयर 47.4 टक्के आहे. त्यानंतर ह्युंदाईचा नंबर येतो याचे मार्केट शेयर 17 टक्के आहे. नोव्हेंबर महिन्यांत मारुती सुझुकीने 1 लाख 35 हजार 700 कारची विक्री केली होती. तर ह्युंदाईने गेल्या नोव्हेंबर मध्ये 48 हजार 800 कारची विक्री केली होती. यानंतर तिस-या क्रमांकावर टाटा मोटर्स आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.