Tata  XTA+ variants : टाटा मोटर्सच्या हॅरियर व सफारीचे एक्सटीए + व्हेरिएण्टस् लॉन्च, आकर्षक किंमतीसह नव्या सुविधा

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या प्रमुख एसयूव्ही असलेल्या टाटा हॅरियर व  टाटा सफारीचे एक्सटीए + व्हेरिएण्टस् लॉन्च केले आहे. नवीन व्हेरिएण्टसमध्ये सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल. तर,  पॅनोरॅमिक सनरूफ यांची सुविधा असणार आहे. क्रायोटेक 2.0 डिझेन इंजिनची शक्‍ती असलेल्‍या नवीन एक्‍सटीए+ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये इतर अनेक वैशिष्‍ट्ये आहेत.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिटच्‍या मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले,  ‘आम्‍हाला हॅरियर व सफारीला मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांच्‍या प्रेमामुळे उच्‍च एसयूव्‍ही विभागामध्‍ये अग्रस्‍थान प्राप्‍त करण्‍यात आम्हाला मदत झाली आहे. ग्राहकांच्‍या गरजांना अधिक प्राधान्‍य देत आणि नवीन उत्‍पादने व वैशिष्‍ट्यांसह आमचा पोर्टफोलिओ सातत्‍याने सुधारत, नवीन टाटा हॅरियर व टाटा सफारीचे एक्सटीए + व्हेरिएण्टस् लॉन्च केले आहे. यामध्ये सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देणारे 6 स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आणि पॅनोरॅमिक सनरूफसह ग्‍लोबल क्‍लोज, अॅण्‍टी पिंच व रेन सेन्सिंग क्‍लोजर अशी कार्यक्षम वैशिष्‍ट्ये असतील.’

नवीन हॅरियर व सफारीमध्ये काय आहेत वैशिष्ट्ये

नवीन हॅरियरमध्ये प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, ड्युअल फंक्‍शन एलईडी डीआरएलएस, आर 17 अलॉई व्‍हील्‍स, फ्लोटिंग आयलँड 7 इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिमसह 8 स्‍पीकर्स (4 स्‍पीकर्स + 4 ट्विटर्स), अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कार प्‍ले कनेक्‍टीव्‍हीटी, पुश बटन स्‍टाट, फुल्ली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल, रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटो हेडलॅम्‍प्‍स आणि रेन सेन्सिंग वायपर्स. तसेच सफारीमध्‍ये आयआरए कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये, मूड लायटिंग, क्रूझ कंट्रोल व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत दोन्‍ही नवीन एक्‍सटीए+ व्‍हेरिएण्‍टमध्‍ये प्रमाणित वैशिष्‍ट्ये म्‍हणून ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍स, प्रगत ईएसपी, फॉग लॅम्‍प्‍स व रिव्‍हर्स पार्किंग कॅमेरा आहे.

अशा आहेत किंमती

हॅरियर एक्‍सटीए+ 19.14 लाख रूपये, हॅरियर एक्‍सटीए+ डार्क 19.34 लाख रूपये व सफारी एक्‍सटीए+  20.08 लाख रूपये.

हॅरियर आणि नवीन सफारीबाबत अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट देता येईल.
https://cars.tatamotors.com/suv/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.