Tathawade : वडिलांना दारु पाजतोस म्हणत स्नॅक्स टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्या वडिलांना तू दारू पाजतोस म्हणत एका(Tathawade) तरुणाने स्नॅक्स टपरी चालकाला मारहाण करत टपरीतील सामानाची तोडफोड केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) जीवननगर, ताथवडे येथे घडला आहे.

याप्रकऱणी संतोष लिंबाजी डोंगरे (वय 38 रा. ताथवडे) यांनी (Tathawade)वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून वैभव संभाजी पवार (वय 33 रा. ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Bhosari : वडिलांशी हुज्जत घातल्याचा जाब विचारला म्हणून तिघांकडून तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ताथवडे येथे स्नॅक्स ची टपरी आहे. पिर्यादी टपरीवर असताना आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादीला तु माझ्या वडिलांना दारु का पाजतोस म्हणत टपरीवरील सामानांची तोडफोड केली.

यावेळी फिर्यादी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.