Bhosari : वडिलांशी हुज्जत घातल्याचा जाब विचारला म्हणून तिघांकडून तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – वडिलांशी हुज्जत घातल्यामुळे मुलाने (Bhosari)याबाबत विचारणा केली म्हणून तिघांनी कोयत्याने मुलावरच वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.1) भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह जवळ घडला आहे.

याप्रकऱणी आब्बास इकबाल आत्तार (वय 27 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (रा. मोशी), सुनिल राणोजी जावळे (रा. आदर्श नगर , मोशी) व रोहीत ऊर्फ कुक्या ज्ञानेश्वर सोनवणे (रा. भोसरी) यांना अटक केली आहे.

Pimpri : शाळेची बॅग फाडली म्हणून एका शाळकरी मुलाकडून दुसऱ्या शाळकरी मुलावर चाकुने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांना (Bhosari)आरोपींनी मी सांगेन तेथूनच मासे घे नाही तर तुला बघतोच म्हणत हुज्जत घातली. यावेळी फिर्यादी हे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी तुला जिवंत सोडत नाही तुझा गेमच वाजवतो म्हणत त्यांच्या जवळील कोयत्याने वार केले.

यावेळी वार चुकवताना फिर्यादी यांच्या हाताला गंभीर जंखम झाली. तसेच त्यांनी हातात कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.