Pimpri : शाळेची बॅग फाडली म्हणून एका शाळकरी मुलाकडून दुसऱ्या शाळकरी मुलावर चाकुने वार

एमपीसी न्यूज – शाळेची बॅग फाडली या किरकोळ (Pimpri )कारणावरून एका शाळकरी मुलाने दुसऱ्या शाळकरी मुलावर चाकुने वार केले आहेत. ही घटना पिंपरी येथे एच.ए हायस्कूल समोर गुरुवारी (दि.1) घडली.

याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे . यावरून सहा अल्पवयीन मुलावंर गुन्हा दाखल करत त्यांच्या नातेवाईकांना समजपत्र दिले आहे.

Maval :मावळचे प्रथम संसदरत्न खासदार स्व. मा. गजानन बाबर यांना द्वितीय पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा हा (Pimpri )शाळेत परिक्षेसाठी जात असताना त्याची बॅग दुसऱ्या मुलांनी ओढल्याने ती फाटली. यावेळीगुन्हा दाखल असलेली मुले व फिर्यादी मुलगा यांच्यात भांडणे झाली. याचाच राग मनात धरून फिर्यादी मुलाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल मुलांनी चाकुने फिर्यादीच्या पोटात वार करत त्याला गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

मात्र शाळकरीमुलांमध्ये वाढत जाणारी भाईगिरीची क्रेज व गुन्हेगारी ही चिंताजनक आहे. दोन ते तीन दिवसांपुर्वी पुण्यात देखील शाळकरी मुलांनी त्यांच्याच शाळेतील एका मुलावर कोत्याने वार केले होते. त्यामुळे शाळा मध्ये देखील गुन्हेगारी पसरत चालल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यासाठी पालक व पोलिसांनी एकत्रितपणे या गुन्हेगारीला आळा घालणे गरजेचे आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.