Breaking news: दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने आज सकाळपासून पुणे- मुंबई हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा

एमपीसी न्यूज : दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने आज सकाळपासून एक्सप्रेस वे वर वाहनांच्या लांबव्ह लांब रांगा दिसत आहेत. हायवे पोलीस वाहतूक ब्लॉक घेऊन वाहतूक नियमन करत आहेत.
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या दिशेने बोरघाट आणि खालापूर टोल नाक्या जवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा दिसत आहेत.

वाहनांच्या लांब रांगांचे कारण
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने व शनिवार-रविवार असे दोन सलग सुट्टी असल्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील नागरिक आपल्या गावी किंवा पर्यटन स्थळी जाण्यासाठी बाहेर निघाल्याने मुंबई- पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहने येत आहेत. त्यामुळे आज दुपार पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र पोलीस केंद्र, बोरघाटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहतूक नियमन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.