Thergaon : थेरगावमध्ये 25 डिसेंबर रोजी करिअर गाईडंस् आणि व्यवसायिक शिक्षण मेळावा

एमपीसी न्यूज – थेरगाव प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका सौ.मायाताई संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सर्वात मोठा करिअर गाईडंस् आणि व्यवसायिक करिअर शिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मंगळवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बाळासाहेब मातेरे उपस्थित राहणार आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, चाकण येथील कला जनसेटचे मनोज फुटाणे, पिंपरी पालिकेचे सहशहर अभियंता प्रविण तुपे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजक प्रगती शिक्षण संस्थेचे संचालक गणेश गुजर आणि जय गणेश नागरी पतसंस्थेचे संचालक अनिल बोरकर यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व मिटकॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास पालक, विद्यार्थी, व युवकांसाठी पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सर्वात मोठा असा हा शिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात एकात ठिकाणी तब्बल 60 हून अधिक कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना अगदी मोफत स्वरूपात मिळणार आहे. यात प्रामुख्याने इंजिनअरिंग, आर्मी, एअर फोर्स, एअर होस्टेस, कॉम्प्युटर हार्डवेअर, नर्सिंग, हॉस्पिटँलिटी, स्पोर्टस्, फिल्म मेकिंग-अँक्टिंग, बीएसई, म्युझिक, फँशन डिझायनिंग अशा असंख्य कोर्सेची संपूर्ण माहिती मंगळवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या मेळाव्यात पालक व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन प्रगती शिक्षण संस्थेचे संचालक गणेश गुजर आणि जय गणेश नागरी पतसंस्थेचे संचालक अनिल बोरकर यांनी केले आहे. या मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी थेरगाव, संतोषनगर येथील जय गणेश नागरी पतसंस्था आणि जनसेवा नागरी पतसंस्था येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.