Chinchwad : गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंकजा मुंडे यांचा चिंचवड दौरा

गोपीनाथ मुंडे यांची 69 वी जयंती रविवारी

एमपीसी न्यूज – लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. 23 डिसेंबर ) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 वाजता शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होईल. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, नगरसेवक केशव घोळवे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, संघटन मंत्री सुनिल कर्जतकर, रवि अनासपुरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पीएमआरडीचे अध्यक्ष किरण गित्ते, पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी चिंचवड, मराठा वाडा जनविकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन, भगवानबाबा मित्रमंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, जय भगवान युवा फाऊंडेशन, भगवान सेना, भगवानबाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.