Alandi : पुतण्याने चोरलेल्या मोबाईलची चुलता लावायचा विल्हेवाट; दोघांकडून 12 मोबाईल्स फोन जप्त

एमपीसी न्यूज – अल्पवयीन पुतण्याने चोरलेल्या मोबाईलची चुलता विल्हेवाट लावत असे.याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन 12 मोबाईल्स जप्त केले.

राहुल अभिमान चौरे (रा. चक्रेश्वर मंदिराजवळ चाकण) असे चुलत्याचे नाव आहे. याच्यासह त्याच्या अल्पवयीन मुलाला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले.

आळंदी पोलिसांना माहिती मिळाली की, आळंदी परिसरात घरातून मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन मुलगा इंद्रायणी नदी घाटावर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी इंद्रायणी नदी घाटावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलाने आळंदी परिसरात घरातून, खिडकीजवळ ठेवलेले मोबाईल्स चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरलेले मोबाईल्स विक्री करण्यासाठी काका राहुल याच्याकडे दिल्याचेही मुलाने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी चुलता राहुल याला ताब्याग घेतले. पुतण्याने चोरलेले विक्रीसाठी दिलेले 12 मोबाईल्स राहुल याने पोलिसांना काढून दिले. या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्यातील एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अन्य मोबाईल मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर, पोलीस कर्मचारी खेडकर, गोल्हार, कारभळ, गर्जे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.