Bhosari: बस मध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – भोसरी येथील पीएमटी बस स्टॉपवर बसमध्ये चढत असताना (Bhosari)एका महिलेच्या कानातील दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 15) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (Bhosari)अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC : शहरातील नालेसफाईला सुरूवात 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भोसरी पीएमटी बस स्टॉप येथून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले चोरून नेले. प्रवास संपल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.