Talegaon : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज – लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

सूरज राजेंद्र रायकर (वय 28, रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील (Talegaon) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा विवाह सोहळा आज (मंगळवारी, दि. 16) नियोजित होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान, सकाळी त्याने मामाला फोन केला. “मला लग्न करायचे नाही”, असे सांगून तो घराबाहेर पडला.घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सुरज कोठेही सापडला नाही.

Ravet : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू

काही वेळानंतर घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या  वाण्याचा मळा (Talegaon) येथील विहीरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी विहीरीत शोध घेण्यास सुरुवात केली असता सुरजचा मृतदेह विहीरीमध्ये आढळून आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात शोककळा पसरली  आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.