Wakad : चार वर्षीय मुलासह महिलेची अकराव्या मजल्यावरून उडी; दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – मानसिक आजाराशी झुंजत असलेल्या महिलेने आपल्या चार(Wakad )वर्षीय मुलाला घेऊन इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 20) पहाटे पाच वाजताच्या सुमारास वाकड येथील यमुना नगर मध्ये रेगालिया सोसायटीमध्ये घडली.
कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्रे (वय 32), विहान संकेत आवटे(Wakad )(वय 4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि संकेत यांचा सन 2018 मध्ये विवाह झाला होता. संकेत हे नोकरी निमित्त अमेरिकेत होते. कोमल या देखील पती संकेत सोबत अमेरिकेत गेल्या होत्या. तिथे असताना त्यांना मानसिक आजार जडला. कोमल आणि मुलगा विहान यांच्या मागे भूत लागली आहे, अशी त्यांना भीती वाटत असे. त्याबाबत त्यांच्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांचा मानसिक त्रास सुरूच राहिल्याने दोन दिवसांपूर्वी त्या भारतात परतल्या होत्या.

त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी संबंधित डॉक्टरांची वेळ देखील घेण्यात आली होती. कोमल आणि मुलगा विहान हे दोघेही वाकड येथील त्यांच्या घरी आले. त्यांच्यासोबत सासू-सासरे आणि आई-वडील देखील होते. मानसिक त्रास जाणवत असल्याने कोमल यांना जास्त भीती वाटू लागली. त्यांनी शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास राहत्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून मुलगा विहान सोबत उडी मारली. त्यानंतर दोघांनाही सांगवी येथील जिल्हा सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.