Bhosari : नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी देण्याच्या बहाण्याने एका जॉब कन्सल्टन्सीने तरुणांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाशिक फाटा येथे ट्रगल जॉब कन्सल्टन्सीमध्ये 12 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत घडला. 
संदीप शिवाजी निकम (वय 28, रा. भरतगाव वाडी, ता. जि. सातारा) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवकुमार दिलीप भिंगोरे, प्रेम सुरवसे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नाशिक फाटा येथे ट्रगल जॉब कन्सल्टन्सी सुरू केली. त्यांनी तरुणांना नोकरी देण्याचे अमिश दाखवून त्यांच्याकडून हजारो रुपये घेतले. फिर्यादी संदीप यांच्याकडून आरोपींनी 43 हजार 900 रुपये घेतले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही. तसेच आरोपींनी आणखी काही तरुणांकडून पैसे घेतले असून त्यांना देखील नोकरी न देता फसवणूक केली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाययक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.