Thergaon : घरातील दागिन्याबाबत विचारणा केली म्हणून मुलानेच केले आईवर जीवघेणे वार

एमपीसी न्यूज – घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले ( Thergaon ) याबाबत आईने विचारले असता मुलाने थेट चाकूने आईवरच जिवघेणे वार केले आहेत. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.11) थेरगाव येथे घडली आहे.

 

याप्रकरणी आईने वाकड पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली असून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय 19 रा. थेरगाव)  याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Talegaon Dabhade : रोटरी सिटी व फिटनेस क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा ओंकार याला फिर्यादी यांनी घरातील कपाटातील दागिन्याबाबात विचारणा केली की,  तू दागिने विकले की गहाण ठेवले, अशी विचारणा केली. तसेच दागिने कोठे आहेत सांग नाही तर पोलिसांना बोलावेन असे म्हटले.

 

याचा राग आल्याने आरोपीने थेट घरातील चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर व हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Thergaon ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.