Talegaon Dabhade : रोटरी सिटी व फिटनेस क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व डॉ. खिस्तीस फिट ( Talegaon Dabhade) फॅमिली लाईफस्टाईल झोन फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. आरोग्य तपासणीसह चांगल्या आरोग्याचा मंत्र यावेळी उपस्थितांना देण्यात आला. योग्य आहार, विहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, ताणतणाव, धकाधकीचे जीवन इ.मुळे मानवास विविध आजार होतात यावर मात करण्यासाठी नागरिकांना योग्य आहार व व्यायामाची गरज आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी करताना फिटनेस क्लबची आवश्यकता विशद केली.

नियमित वैद्यकीय तपासणी करून सुदृढ जीवनशैली साठी अशा शिबिराची नितांत आवश्यकता असून नागरिकांनी त्याप्रमाणे आचरण करावे असे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी सदर प्रसंगी विशद केले. फिटनेस क्लबची कार्यपद्धती,उद्देश,उपयोगीता व निरोगी आरोग्यासाठी आवश्यकता डॉ.राहुल खिस्ती यांनी विशद केली.
सदर प्रसंगी रो.दिलीप‌ पारेख,प्रकल्प प्रमुख रो.रामनाथ कलावडे,ज्योती दुर्गे,भूपेश पांडे,अनुराधा फाले,वैशाली चव्हाण,राहुल जाधव,कल्याण लेकुरवाळे यांनी मनोगताद्वारे उपक्रमाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन रोटरी सिटीचे सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले तर आभार फिटनेस क्लबच्या अनुराधा फाले यांनी मानले.
रो.संजय मेहता,रो.संजय वाघमारे, रो.प्रदीप टेकवडे, रो.प्रसाद पादीर,रो.रघुनाथ कश्यप,रो.तानाजी मराठे, रो.बाळासाहेब चव्हाण,रो.वर्षा खारगे इ.व फिटनेस क्लब मेंबर्स यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. शिबिरात 45 नागरिकांनी लाभ घेतलाअसून पुढील काळात देखील नागरिकांची मोफत बॉडी चेकअप करण्याची ग्वाही डॉ.राहुल‌ खिस्ती यांनी सदर  ( Talegaon Dabhade) प्रसंगी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.