Talegaon : कंपनीत कामावर घेण्याची मागणी करत एकाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – उंब्रे येथील जेसीबी कंपनीतून काढून ( Talegaon ) टाकल्यानंतर आम्हाला कामावर परत घ्या, नाही तर पगारा एवढा हप्ता द्या , नाही तर हातपाय तोडून जिवे मारून टाकू अशी धमकी देणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरु होता.

विजय शंकर दळवी (रा.वडगाव मावळ) व नागेश भरत आंबेकर (रा देवळे, मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि.12) संजय आबाजी शेलार (वय 52 रा.वराळे, मावळ) तळेगाव एमआयडीसी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Thergaon : घरातील दागिन्याबाबत विचारणा केली म्हणून मुलानेच केले आईवर जीवघेणे वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांना जेसीबी कंपनी येथून कामावरून काढून टाकले होते. यावेळी आरोपी हे फिर्यादीला सतत फोन करून कामावर परत घेण्यासाठी मागणी करत होते. आम्हाला परत घ्या नाही तर पगारा एवढा हप्ता द्या अन्यथा घरात घुसून हातापाय तोडून जिवे मारून टाकू अशी धमकी फिर्यादीला दिली . यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत ( Talegaon ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.