Chinchwad : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून मजूराला दगडाने मारहाण, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – दिलेले उसने पैसे मागितले म्हणून ( Chinchwad ) एका मजुराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी चिंचवड येथील भोंडवे वस्ती येथे घडली आहे.

 

याप्रकरणी राजू पंडित हजारे (वय 42 रा. चिंचवड) यांनी सोमवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी अभिषेक रणजित कसबे (रा. चिंचवड) याला अटक केली आहे.

 

Talegaon : कंपनीत कामावर घेण्याची मागणी करत एकाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी आरोपीले उसने पैसे दिले होते. ते पैसे परत मागण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्याशी वाद घालत फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपीला आटक केली आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत ( Chinchwad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.