Thergaon : व्हेरॉक अकादमीचा पूना क्लबवर विशाल धावसंख्येने विजय

एमपीसी न्यूज – व्हेरॉक 16 वर्षाखालील (Thergaon) स्पर्धेमध्ये व्हेरॉक वेंगसरकार अकादमीने पूना क्लबला 214 धावसंख्येच्या विशाल फरकाने हरवले. हा सामना 27 एप्रिल व्हेरॉक क्रिकेट ग्राउंड, थेरगाव येथे संपन्न झाला. स्पर्धेमध्ये व्हेरॉक वेंगसरकार अकॅडेमिचा हा दुसरा विजय. नाणेफेकचा निकाल पूना क्लबच्या पक्षात लागला व त्यांनी गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना अथर्व काळे हा खाते न उघडताच बाद झाला. परंतु, आरव धनकुडे यांनी अद्विका तिवारीची साथ देत 41 चेंडूंमध्ये 40 धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अद्विका तिवारीने सर्वोत्कृष्ट खेळी करत शतक मारले. त्याने 106  चेंडूंमध्ये 106 धावा काढून सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला.

अर्णव ढोले याने ही चांगली कामगिरी करत 75 चेंडूंमध्ये 72 धावा काढल्या. श्रेयस शिवरकर आणि अरनेश पाटील यांचा योगदानाने व्हेरॉक 290 या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचली. पूना क्लुबकडून गोलंदाजी करताना पार्थ लालासुरे याने 2 बळी घेतले तर हर्षवर्धन आणि समर्थ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Punawale : घरासोबत मोबाईल व रोख रक्कमेचीही साफसफाई; 41 हजरांचा ऐवज चोरीला

290 या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना पूना क्लब (Thergaon) सामन्यावर नियंत्रणच मिळवू शकले नाहीत. सलामीवीर चैतन्य मुदपे हा खाते न उघडताच बाद झाला. अवधूत हारवाडे (18 धावा), अक्षत शाह (7 धावा), समर्थ भोरे (4 धावा), जयवर्धन डेडगे (1  धाव), यश चामोला ( 0 धावा), ओवैस अन्सारी (19 धावा), पार्थ लालासुरे ( 1 धाव), हर्ष कांबळे (7 धावा) व विराट पाटील (0  धावा) अशी पडती लागत गेली. व्हेरॉक कडून गोलंदाजी करताना रुद्र खैरनार, अरमान बोरकर आणि अथर्व काळे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर अर्णव जगताप, वरद छत्तर आणि अलोक लोढा या सर्वानी प्रत्येकी 1 बळी घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.