Punawale : घरासोबत मोबाईल व रोख रक्कमेचीही साफसफाई; 41 हजरांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – ते आले; त्यांनी (Punawale) घर तर साफ केलं आणि सोबतच घरातील मोबाईल व रोख रक्कम देखील साफ केली. हा चोरीचा प्रकार मंगळवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा ते रात्री आठ या कालावधीत पुनावळे मध्ये पुनेव्हिले सोसायटीमध्ये घडला.

विद्युत भवरसी अरोरा (वय 48, रा. पुनेव्हिले सोसायटी, पुनावळे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 26) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रामेश्वर पंजाबराव देशमुख (वय 24), उत्कर्ष संघपाल दुधमल (वय 19, दोघे रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

MPC News Special : पोलीस आयुक्त ट्विटरद्वारे साधणार नागरिकांशी थेट संवाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या फ्लॅटची साफसफाई करत असताना रोकडसह तीन हजारांचा मोबाइल असा 41 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला याचा पुढिल तपास रावेत पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.