MPC News Special : पोलीस आयुक्त ट्विटरद्वारे साधणार नागरिकांशी थेट संवाद

एमपीसी न्यूज – नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी (MPC News Special) पोलिसांकडून विविध योजना सुरु केल्या जातात. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तांचे ट्विटर @CP_PCCity खाते सुरु केले असून त्यावरून पोलीस आयुक्त थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियावरील आपले अकाऊंट सुरु केले. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब आदी अकाउंटचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यासोबत तडीपार गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी एक्स ट्रॅकर, पोलीस सेवा लोकाभिमुख करण्यासाठी सेवा उपक्रम आदींची देखील सुरुवात करण्यात आली.

काही महिन्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस सोशल मीडियावर इनऍक्टिव्ह मोडवर गेले. युट्युबवर मुहूर्ताचा केवळ एक व्हिडीओ अपलोड आहे. त्यानंतर एकही व्हिडीओ अपलोड झालेला नाही. फेसबुक पेज काही महिन्यांपासून पोस्टच्या प्रतीक्षेत आहे. तर इंस्टाग्राम अकाउंटवर काही महिन्यांपासून शुकशुकाट आहे.

दरम्यान, ट्विटर हॅण्डल देखील इनऍक्टिव्ह मोडमध्ये होते. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीत आयटी नगरी असल्याने हिंजवडी, तळवडे तसेच शहरातील अन्य भागातील नागरिक ट्विटरवर सक्रिय असल्याने ट्विटर हॅण्डल पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला. त्यानुसार ट्विटर हॅण्डल पुन्हा सक्रिय करत पोलिसांनी त्यावर नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

Pimpri : हिमालयातील साहसी पदभ्रमंतीसाठी ‘युवाशक्ती’कडून 155 पुणेकर रवाना

पोलिसांनी केलेले उत्कृष्ठ तपास, आवाहन आदींबाबत पोस्ट केल्या जात आहेत. पोलिसांच्या (MPC News Special) पोस्टवर नागरिक प्रतिसाद देतात, प्रश्न, समस्या उपस्थित करतात. त्यांच्या समस्या नोंदवून घेत पोलीस संबंधितांकडे त्या पाठवत आहेत. आपल्या तक्रारी ऐकून घेतल्या जात असल्याचे समाधान या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे. ट्विटर प्रमाणेच अन्य सोशल मीडिया अकाउंट देखील सक्रिय करण्याची मागणी शहर वासियांकडून केली जात आहे.

त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आले आहे. नागरिकांचा पोलीस कामकाजात परिणामकारक सहभाग हे मुख्य उद्दिष्ट आहे. हे ट्विटर हँडल कार्यरत करणे हे त्या दिशेने ऊचललेले पाऊल आहे. मी लवकरच लाईव्ह प्रश्नोत्तरातून थेट संपर्क साधणार असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.