Chikhali : चिखली घरफोडीत तीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – चिखली येथे बंद घराची कडी तोडून (Chikhali) घरातून तीन लाख रुपये रोख चोरून नेले आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि.8) चिखली येथील सानेचौक येथील जगदंबा निवास येथे घडला. 

Pune News : फोनवरून ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने ‘लॉ’च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

भोलाराम गोनराम चौधरी (वय 59, रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश करून बेडरुम मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशानेतरी उघडून कपाटातील लॉकर तोडून त्यातील रोख रक्कम 3 लाख रुपये चोरून नेले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.