Today’s Horoscope 01 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – बुधवार.

01-03-2023

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 9.52 पर्यंत नंतर आर्द्रा. 

चंद्र राशी – मिथुन.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहारात फसवणूक होऊ शकते. सतर्क रहा. विद्यार्थी अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

आज कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. दुरावलेले मित्रही जवळ येतील. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दिवस लाभाचा आहे.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल. जेष्ठांनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कर्क (शुभ रंग- मरून )

घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणार नाही. आज वाद टाळून सुसंवाद साधा.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात प्रगती रथ वेगाने धावेल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज कंजूषणास लगाम घालून थोडी चैनही कराल.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )

आज आळस झटकून कामाला लागल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचेही योग्य नियोजन केल्याने कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा )

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका झटपट लाभाच्या मोहाने आज निराशाच पदरी पडेल.

MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

धनु- (शुभ रंग- लाल )

केवळ भिडस्तपणा पायी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे. आज तुम्ही जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

मकर ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. त्यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका

कुंभ (शुभ रंग – केशरी )

आज तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज  तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. नवोदित कलाकार संधीचे सोने करतील. नोकरदारांना मात्र तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

गृहिणी आज घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल. प्रेमीयुगोलांनी तर आजच्या दिवस मौनव्रत ठेवणेच हिताचे राहील. लहान मुलांचे हट्ट वाढतील.

 

 

 

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.