RTE : आरटीई’ प्रवेशाला उद्यापासून प्रारंभ, अर्जासाठी 17 मार्चपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची (RTE) संधी उपलब्ध करून दिली जाते. आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणी बुधवारपासून ( 1 मार्च) सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्जांसाठी अंतिम मुदत 17 मार्च आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. आरटीई प्रवेशांसाठीची शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोंदणी कधी सुरू होणार या कडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेशासाठी मुलाचे आधारकार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून (RTE) सूचना देण्यात आल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. तरीपण, संबंधित पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांना 1 मार्च ते 17 मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.

Today’s Horoscope 01 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार 827 शाळांमध्ये एक लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची  माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.